या नभांनो, या तुम्ही
या नभांनो, या तुम्ही कडाडणारी विदुल्लता घेउनी अन् बरसु द्या आज पर्जन्यधारा ओला होऊ दे कोरडा आसमंत सारा. हॆ नभा, न ठेउनी भान. गडगडत ये तुला विजेची आण आज- आज बरसू दे तुझ्या सरी बेभान, बेधुंद कोसळत ये तुझ्या घरी काळ्याकभिन्न बादलांनो वसुंधरेच्या पिल्लांनो पंख झाडुनी या तुम्ही.. हे नभा कोसळ आज. आज होऊ दे च मनाची आस पुरी खळखळून वाहु दे जलधारा ओला होऊ दे कोरडा आसमंत सारा ये!, ये नभा!, ये तु!, येच तु!! अन् मिसळू दे अश्रुत पाणी!!