Posts

Showing posts from December, 2015

वाहत राहते इंद्रायणी!!

तुकोबाची माळ, तिचा एकेक मणी निसटला इंद्रायणीत काळ वाहत राहिला पाण्यासारखा.. उरले फक्त तरंग. उन्हात पाण्यावर हलल्या  सावल्या त्याच नदीत परत नाही उतरता येत पाणी वाहून गेलेय. तुकोबाची माळ हरवली उथळ-गढूळ पाण्यात.. विखुरले तिचे एकेक मणी वाहत राहते  इंद्रायणी!! © विजय नेटके  नागपूर,  १२ डिसेंबर २०१५   दुपारी  २ वाजता