Posts

Showing posts from January, 2016

तू होतासच प्रतिभावान

तू होतासच प्रतिभावान ही काजळी नंतर चढली आयुष्याच्या निबिड अरण्यात, आसवांच्या दवबिंदूत, अस्तित्वाच्या तलवारीला गंज लागला. गोठ्यात हुंदडणाऱ्या वासराला, पायगोवा घातलास कालौघात. उमलणाऱ्या कळ्या कुरतडल्यास, जगण्याच्या कुत्तरओढीत. हेच का रे तुझे शौर्य? अंधाराला घाबरलाय तो रवीचा किरण. ते बघ, ते बघ ! डोंगराऐवढे  ढग, लालबुंद, काळेकुट्ट, घनघोर ढग.. त्यात झाकोळलाय तो सुर्य तो तू आहेस.!! ©विजय नेटके  २ जानेवारी २०१६, नागपूर