Wednesday, April 29, 2015

पावसाळी रात

सुसाट वारा 
हलती झाडे, 
अन् वरतीही 
वीज कडाडे 

चराचरातून 
फिरते आज 
ऎक सखे, ती 
सागरगाज 

भिजलो मी 
परतीच्या भिजल्या  वाटा 
बघ, हाय! 
किनाऱ्यावरती लाटा !!

नयन तुझे 
कोदंड जरी 
येती माझ्या 
तीर उरी 

अधीर अधर 
न धरवे धीर 
तृष्णा ही तू 
तू मज नीर 


दिसे न त्याला 
त्या चंद्राला,
रात्र भिजुनी 
झाली काळी. 

विरह असे तो 
पुन्हा सकाळी..!!


- विजय नेटके ©

No comments:

Post a Comment