तुम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
उगाच त्यांना वाटत नका फिरू
उगाच त्यांना वाटत नका फिरू
याजसाठी तुमचा इतका अट्टाहास
किती बोलता आता करा की बास
किती बोलता आता करा की बास
बस कर रे भाऊ, की इथुनी निघोनी जाऊ
एकच तुतारी किती फुंकशील ?
त्याच तुतारीत मेले उंदीर
शब्दबंबाळ झाले उंदीर
तरी शब्द इथले संपत नाही!
शांत रात्र ही पंक्चरली, तरी पंपता तुम्ही आवाज
एकच तुतारी किती फुंकशील ?
त्याच तुतारीत मेले उंदीर
शब्दबंबाळ झाले उंदीर
तरी शब्द इथले संपत नाही!
शांत रात्र ही पंक्चरली, तरी पंपता तुम्ही आवाज
जरी शब्दांचा भरला प्याला,
फेस भराभर जरी उसळला,
फुलराणी ती बोलत होती.!
फेस भराभर जरी उसळला,
फुलराणी ती बोलत होती.!
किती गर्जतो शब्दांचा हा गर्जा जयजयकार
माळावरच्या बांधावरती विलोलनयना जरा
शांत राहावे श्रावणमासी, कटी ठेऊनी करा
पुरे झाले शब्द सारे, पुरे झाला त्यांचा मारा
मीच विनवितो हात जोडूनी, थोडं जरा चिल्ल मारा..
माळावरच्या बांधावरती विलोलनयना जरा
शांत राहावे श्रावणमासी, कटी ठेऊनी करा
पुरे झाले शब्द सारे, पुरे झाला त्यांचा मारा
मीच विनवितो हात जोडूनी, थोडं जरा चिल्ल मारा..
१८ एप्रिल २०१५, नागपूर.
विजय नेटके ©
(ज्ञानोबा, तुकोबा, केशवसुत, मर्ढेकर, बालकवी, कुसुमाग्रज व ग्रेस यांची क्षमा मागून)
विजय नेटके ©
(ज्ञानोबा, तुकोबा, केशवसुत, मर्ढेकर, बालकवी, कुसुमाग्रज व ग्रेस यांची क्षमा मागून)
No comments:
Post a Comment