Posts

Showing posts from 2015

वाहत राहते इंद्रायणी!!

तुकोबाची माळ, तिचा एकेक मणी निसटला इंद्रायणीत काळ वाहत राहिला पाण्यासारखा.. उरले फक्त तरंग. उन्हात पाण्यावर हलल्या  सावल्या त्याच नदीत परत नाही उतरता येत पाणी वाहून गेलेय. तुकोबाची माळ हरवली उथळ-गढूळ पाण्यात.. विखुरले तिचे एकेक मणी वाहत राहते  इंद्रायणी!! © विजय नेटके  नागपूर,  १२ डिसेंबर २०१५   दुपारी  २ वाजता

या नभांनो, या तुम्ही

या नभांनो, या तुम्ही कडाडणारी विदुल्लता घेउनी अन् बरसु द्या आज पर्जन्यधारा ओला होऊ दे कोरडा आसमंत सारा. हॆ नभा, न ठेउनी  भान. गडगडत  ये तुला विजेची आण आज- आज बरसू दे तुझ्या सरी बेभान, बेधुंद कोसळत ये तुझ्या घरी काळ्याकभिन्न बादलांनो वसुंधरेच्या पिल्लांनो  पंख झाडुनी या तुम्ही.. हे नभा कोसळ आज. आज होऊ दे च मनाची आस पुरी खळखळून वाहु दे जलधारा ओला होऊ दे कोरडा आसमंत सारा ये!, ये नभा!, ये तु!, येच तु!! अन् मिसळू दे अश्रुत पाणी!!

हुंदके सारे गुदमरून गेले

त्या जड अनामिक ओझ्याने  हुंदके सारे गुदमरून गेले  ओलावल्या पापण्यांनी  शब्द, ते भिजून गेले  उसावलेल्या श्वासांनी  तुझ्यात मी मिसळून गेले  अवरुद्ध कंठाने  रात्र मी कंठित गेले  © विजय नेटके  नागपूर, १३ जुन २०१५, रात्री २. ४५ वाजता 

गंगा

Image
होय पुरातन, परी नवीनतम  अशा हिमातून उगम तिचा, ती असे चिरंतन हिमालयाच्या शुभ्र कुशीतुनी ती येते, ती येते खाली कुठे भासते गौरीसम ती कुठे भासते मजला काली काळ पसरला जणू धरेवर आडवेतिडवे विशाल डोंगर त्यातुनी जाता पुढे-पुढे ती मला वाटते नितांत सुंदर कधी, कुठे, कशी घाण मिसळते? त्या घाणीचा वासही येतो त्याने माझा जीव गुदमरतो जाती-पाती सम मला भासतो सागराची ओढ तिला तिची ती एकच तळमळ कधी कोणता 'प्रवाह' येतो त्या वळणावर प्रचंड खळबळ 'यमुना' येते तीत मिसळते मिसळूनी तीही गंगा होते. प्रसरणशील अन होय प्रवाही असे पात्र ते सदा धडाडे गाळ, चिखल अन पत्थर झाडे कुणा न झाली बंद कवाडे मैदानी ती संथ वाहते तिथे तिला ना कुठली घाई सर्व तिच्या पदराला येती सर्वांची ती होते आई. -©विजय नेटके (नुकताच ऋषिकेश, उत्तराखंड येथे जाऊन आलो. हिमालय व गंगा आयुष्यात प्रथमच पाहिले तेव्हा मनात विलक्षण शांतता उतरली. गंगा मला भारत- भारतीय संस्कृती-इतिहास याचे रूपक वाटली व शब्दांची कविता झाली.)

Marathwada

Image
India without Ajanta and Ellora is unimaginable. For they represent the great cultural heritage of this blessed land. Then the question: Where is Ajanta and Ellora? Every time I see the countryside in Marathwada, my mind keeps asking this question as to why this region is lagging behind in development after being Political-Cultural hub of Maharashtra, if not India for at least 1500 years? The only Mahajanpada south of Vindhyas was 'Ashmaka' and it was located between rivers Godavari and Manjara i.e in Ma rathwada. Ashmaka got its name from the rocky countryside of the region. No wonder more than 2600 years later GaDiMa used the same words to discri be Maharashtra as: "Rakat desha, Kankhar desha, Dagadanchya desha" The first empire that placed Maharashtra and for that matter whole southern India on world map was: 'Sathvahana' with their capital at Prathistana i.e Modern Paithan in Aurangabad. After Sathvahans came the 'Vakatakas', basica...

शब्दशूर रत्ने

तुम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने  उगाच त्यांना वाटत नका फिरू  याजसाठी तुमचा इतका अट्टाहास किती बोलता आता करा की बास बस कर रे भाऊ, की इथुनी निघोनी जाऊ एकच तुतारी किती फुंकशील ? त्याच तुतारीत मेले उंदीर शब्दबंबाळ झाले उंदीर तरी शब्द इथले संपत नाही! शांत रात्र ही पंक्चरली, तरी पंपता तुम्ही आवाज जरी शब्दांचा भरला प्याला, फेस भराभर जरी उसळला, फुलराणी ती बोलत होती.! किती गर्जतो शब्दांचा हा गर्जा जयजयकार माळावरच्या बांधावरती विलोलनयना जरा शांत राहावे श्रावणमासी, कटी ठेऊनी करा पुरे झाले शब्द सारे, पुरे झाला त्यांचा मारा मीच विनवितो हात जोडूनी, थोडं जरा चिल्ल मारा.. १८ एप्रिल २०१५, नागपूर. विजय नेटके © (ज्ञानोबा, तुकोबा, केशवसुत, मर्ढेकर, बालकवी, कुसुमाग्रज व ग्रेस यांची क्षमा मागून)

पावसाळी रात

सुसाट वारा  हलती झाडे,  अन् वरतीही  वीज कडाडे  चराचरातून  फिरते आज  ऎक सखे, ती  सागरगाज  भिजलो मी  परतीच्या भिजल्या  वाटा  बघ, हाय!  किनाऱ्यावरती लाटा !! नयन तुझे  कोदंड जरी  येती माझ्या  तीर उरी  अधीर अधर  न धरवे धीर  तृष्णा ही तू  तू मज नीर  दिसे न त्याला  त्या चंद्राला, रात्र भिजुनी  झाली काळी.  विरह असे तो  पुन्हा सकाळी..!! - विजय नेटके  ©

जुनाच कडबा

जुनाच कडबा खाती ते  आणि पुन्हा रवंथ त्याची  मनुष्य ? छे छे !! स्थिती बरी हो जनावरांची  शेणाचे ते ढीग साचले  त्यात कीडे ते वळवळती  अज्ञानाच्या जटील श्रुंखला  पुन्हा पुन्हा ते अडखळती  भुते खेळती खांद्यावरुनी  घराघरातुनी त्यांची वाढ  फडताळाच्या लपले आड  विज्ञानाचे पुस्तक काढ जातींचे चौकोनी वाडे  आणि त्याची बंद कवाडे  जन- रीतींचे कुदळ फावडे  त्यात उभा, ते माणूस गाडे !! दारी आलो तुमच्या आज  मला हवी हो थोडी आग  जाळाया ते वाडे ज्यातुनी  वळवळती द्वेषाचे नाग - विजय नेटके  ©